व्यक्ती , समाज व राष्ट्र विकासात शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे. राष्ट्र उभारणीत मानव संसाधन हा एक प्रमुख घटक आहे. मूल्यवर्धित समाजउभारणीसाठी शालेय शिक्षण अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. म्हणूनच महात्मा गांधी मिशन संस्कार विद्यालय सुरु करण्यात आले. शालेय शिक्षण हाच शिक्षणाचा खरा पाया आहे. मुलांचा सर्वांगिण विकास ख-या अर्थाने शालेय शिक्षणातूनच होतो.