उपरोल्लेखित ध्येय डोळयासमोर ठेवून सन २००३-०४ मध्ये महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण खात्याच्या मान्यतेने पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु केली. अवघ्या ८५ विदयाथ्र्यांना घेऊन शाळेने आपला प्रवास चालु केला २००३-०४ ते २०११-१२ पर्यंतची शाळेची संख्यात्मक स्थिती पुढील आलेखावरुन सहज लक्षात येईल.

विदयालयाचा नुसता संख्यात्मक विकासच झाला असे नाही तर गुणात्मक दर्जाही वाढवला. पुढील आलेखावरुन (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेच्या निकाला वरुन ) स्पष्ट होईल.

एस.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या निकालाची टक्केवारी -

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत प्रतीवर्षी मुलांनी अधिकतम किी गुण घेउâन प्रथम आले ते खालील सारणीवरुन कळेल.

या विद्यालयातून शालाबाहय परीक्षांसाठीही तयारी करुन घेतली जाते.

  1. 1. राष्ट्रभाषा सभा पूणे
  2. 2. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
  3. 3. गणित नैपुण्य परीक्षा
  4. 4. महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा
  5. 5. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
  6. 6. सामान्यज्ञान परीक्षा
  7. 7. पाठांतर परीक्षा
  8. 8. प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्त्ती परीक्षा
  9. 9. शासकीय रेखाकला परीक्षा
या शिवाय निबंध स्पर्धा, योगासने, मल्लखांब व अभिनय या स्पर्धांना ही मुलांना तयार केले जाते.