पंधरा मिनिटे ज्याचे वर्णन करण्यासाठी लागतील ते एका दृष्टिक्षेपात प्रकट करण्याची किमया चित्राकृतीची असते. म्हणूनच या विदयालयात चित्रकलाचे स्वतंत्र व मोठे कक्ष असून एकाच वेळी ५० ते ६० विदयार्थी चित्राकृती चितारु शकतील अशी व्यवस्था आहे. उच्चशिक्षित कला शिक्षिक ही जबाबदारी संभाळतात विदयालयाचे सुशोभीकरण मुलांनी चितारलेली चित्रे व उत्तामोत्तम कलाकृतीने करण्यात आले आहे. वेळापत्रकातही या विषयासाठी सर्वच वर्गांना स्वतंत्र तासिका देण्यात आल्या आहेत.
कला क्षेत्र हा देखिल जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. त्यात गायन, वादन, नृत्य नाटय, चित्रशिल्प या सहा अगांचा विद्याथ्र्यांच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रत्येकाच्या अंगात एक सुप्त गुण असतो व अशा सुप्तगुणास जागे करण्यासाठी अथवा प्ररीत करण्यासाठी विद्यालय सतत प्रयत्नशील असते. त्यासाठी विदयालयात विविध कला स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यात शालेय व आंतरशालेय स्पर्धां घेण्यात येतात व मोठया संख्येने विद्यार्थी बसवीले जातात. त्या स्पर्धांची विशेष तयारीही करुन घेतली जाते.
- अथर्व ट्रस्ट डोंबीवली, राज्यस्तरीय विविध ललित कला स्पर्धा
- प्रथमेश प्रतिष्ठान,
- स्टूडंटस डेव्हलपमेंट सोसायटी, पुणे
- सांस्कृतिक कला प्रदर्शन, पुणे
- साईराज्य एज्यू. ट्रस्ट , औरंगाबाद.
- महाराष्ट्र फाऊंडेशन, अंबाजोगाई
- कला संस्कृती कला प्रदर्शन,
वरिल प्रत्येक राज्यस्तरीय कला स्पर्धांना मोठया संख्येने विद्याथ्र्यी बसवीले जातात. या सर्व स्पर्धांमध्ये प्रतिवर्षी विद्यार्थी यश संपादन करतात व राज्यस्तरा पर्यंत नाव लौकीक मिळवितात. वरिल प्रत्येक स्पर्धा कडून विदयालय, कला शिक्षक, मुख्याध्यापक यांचा अनुक्रमे आदर्श विद्यालय, उपक्रमशील कलाध्यापक, उपक्रम प्रिय मुख्याध्यापक या प्रकारच्या पुरस्कारनी सन्मान करण्यात आला आहे.
या शिवाय शालेय व आंतर शालेय चित्रकला स्पर्धांनाही विदयार्थी बसविले जातात. त्यातही विदयाथ्र्यांनी अतिशय चांगले यश संपादन केलेले आहे. शहरात होणाया विविध कला प्रदर्शनाना ही आवर्जुन विदयार्थी पाठवले जातात. व त्यांना कला कृती विषयी माहिती सांगितली जाते. त्याच बरोबर हस्तकला व शिल्पकलेचेही प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येते व प्रत्यक्ष विदयाथ्र्यांकडूनही विविध वस्तू तयार करुन घेतल्या जातात.
इलिमेंटरी व इंटरमिजीएटलाही विदयार्थी बसविले जातात. त्यांचा श्रेणीणीहाय निकाल