"वाचालतर वाचाल." म्हणून मुलांना ग्रंथ संपदेपर्यन्त पोहोंचता आले पाहिजे. ज्यामुळे मुलांना वाचनाची संधी मिळेल म्हणूनच शाळा पातळीपर्यंन्त स्वतंत्र तासिका असून मुलांना ग्रंथालयाचा पुरेपूर लाभ घेता येतो.
स्पर्श - वाचनाची व लेखनाची आवड निर्माण व्हावी म्हणून विदयालयाच्या वतीने स्पर्श हे वार्षिक व पाक्षिक नियतकालिक काढले जाते मुलांच्या लेखनास प्राधान्य असते मुलेच त्याचे संपादन करतात, सुंदर हस्ताक्षरात लेखन, सजावट इत्यादी सर्व मुलेच करतात. मुलांच्या अंत:करणाला स्पर्श करुन जाईल असे हे स्पर्श नियत कालक आहे. शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची असते.