श्रम हीच पूजा. श्रमाचे महत्व व मूल्य लक्षात आणून देण्यासाठीच ही संस्था आधिक जागरुक आहे. यासाठीच कार्यानुभव अर्थात् समाजोपयोगी उत्पादक कार्य या विषयावर आधिक भर दिला आहे. हे शाळा पातळीवरच शक्य आहे. यामुळे प्रत्येक शिक्षक हा धर्म प्रचारकासारखा काम करेल. णहात्मा गांधी मिशन संस्कार विदयालय हे मुलांमधील कौशल्ये, विचार व कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्त्ता यांना गतिमान करणारे, त्यात वाढ व विकास करणारे, त्यातून भारतीय तत्वज्ञान आणि मूल्यांची जपणूक करणारे केंद्र बनावे हा मानस आहे. यासाठी शिक्षक – पालक – विद्यार्थी - मुख्याध्यापक व चालक यात समन्वय असण्याची आवश्यकता आहे़ नेमके या विद्यालयाने यावरच लक्ष केंद्रीत केले आहे.