विकासाच्या क्षेत्रात संगणकाची भूमिका अतुलनीय अशी आहे. अदयावत ज्ञानाच्या संपर्कात कायम ठेवण्याची किमया संगणकामुळे शक्य झाले आहे. समोर असलेल्या अजाNयास उचित उपचार करण्यासाठी अदयावत उपचार पदधती त्याचक्षणी डॉक्टराना कळण्याचे साधन संगणक होय. यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे. यासाठी पहिल्या इयत्तेपासून संगणकाची विदयाथ्र्यांना ओळख होणे व त्यावर प्रत्यक्ष काम करता येणे शक्य होण्यासाठी विदयालयाने स्वतंत्र संगणक प्रयोगशाळेची उभारणी केली असून वेळापत्रकातच प्रत्येक वर्गास स्वतंत्र तासिकांची योजना करण्यात आली आहे. संगणकांची ही स्वतंत्र प्रयोगशाळा असून तज्ञ अध्यापकही आहेत.