विज्ञान विषय हा सध्याच्या अभ्यासक्रमाचा आत्मा आहे नवनवीन संशोधनाने अमूलाग्र बदल झाला आहे. या विषयाचे अध्यापन प्रयोगशाळेशिवाय केवळ अशक्य आहे कृती निरीक्षण व त्याद्वारे अनुमान हा शिक्षणाचा खरा क्रम आहे. ती संधी मुलांना मिळणे गरजेचे आहे. यामुळेच आमच्या विदयालया तीन स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. भौतिक, रसायन व जीव सर्व सुविधनांनी युक्त यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा परिचर पण आहे. मुले स्वत: प्रयोग करतात, निरीक्षण करतात व त्यानुसार निप्कर्षाप्रत पोहेचतात. प्रयोग शाळेत मुले किती रमतात ते पुढील छायाचित्रांवरुन स्पष्ट होते.